Thu. Apr 23rd, 2026

ओमिक्रॅान नियंत्रणास वकिलांचा पुढाकार

Spread the love

ओमिक्रॅान नियंत्रणास वकिलांचा पुढाकार

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

बाहेर आोमिक्रॅानचा कहर झाला असला तरी पुणे धर्मादाय कार्यालयात पक्षकारांचा येण्याचा ओघ काही कमी होत नव्हता. शासकीय नियमावलीचे प्रतिबंधात्मक आदेश व ५०% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे बंधन असूनही अनेक कर्मचाऱ्यांना बाधा झाली. मुंबई कार्यालयातील तरूण उपायुक्त संतोष रोकडे याच कालावधीत निर्वर्तल्याने सर्वांच्याच मनात एक अनामिक भिती दाटून आलेली.
अशा परिस्थितीत येथील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या वकिलांनी पुढाकार घेऊन आठ दिवस सर्वच अर्धन्यायिक कामकाज स्वतःहून स्थगित ठेवण्याच्या निर्णय घेतला. सह आयुक्त सुधीरकुमार बुक्के, उपायुक्त राहूल मामू, सहाय्यक आयुक्त राहूल चव्हाण, राणी मुक्कावार व प्रशांत चव्हाण यांचेशी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. चर्चेअंती केवळ तातडीच्या कामांव्यतिरिक्त सव्वीस जानेवारी पर्यंत इतर कामकाज स्थगितीचे निवेदन उपाध्यक्ष ॲड. मोहन फडणीस व सचिव ॲड. सुनिल मोरे यांनी न्याय अधिक्षक सौ. सुनिता तिकोणे यांना दिले.
या बाबत माहिती देताना खजिनदार ॲड. रजनी उकरंडे यांनी सांगितले की कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी कामकाज स्थगितीचा निर्णय घेण्याशिवाय पर्याय नव्हता. तथापी नविन प्रकरणे दाखल करून घेणे, कागदपत्रांच्या सही शिक्याच्या प्रती काढणे अशा कामांसाठी तळमजल्यावर स्वतंत्र खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत.
————————————
प्रतिबंधात्मक नियमावली वारंवार लागू होत असल्याने प्रत्यक्ष येऊन कामकाज करण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे व्हर्च्युअल कॅान्फर्न्सिंगद्वारे कामकाज करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून प्रत्येक अधिकाऱ्यांची अधिकृत व्ही सी लिंक लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.
*ॲड. शिवराज प्र कदम जहागिरदार*
अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे

Related Post

error: Content is protected !!