पुणे जिल्हा सहकारी बॅंकेवर अजित पवारांचे वर्चस्व, पण इंदापूर व बारामतीची मते फुटल्याने एक जागा गमावली
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत 21 पैकी 14 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर उर्वरित 7 पैकी 6 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, तर एका जागेवर भाजपाने बाजी मारली. त्यामुळे एकहाती सत्ता मिळवण्याची स्वप्न पाहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या एका जागेवर पक्षाला दणका बसला आहे. राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंचा भाजपाचे प्रदिप कंद यांनी 14 मतांनी पराभव केला. अजित पवारांनी प्रचार सभेत प्रदिप कंद यांना जागा दाखवून देण्याचे आवाहन केले होते. मात्र नेमकी तीच जागा जिंकण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरली.
