राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत बिनविरोध……
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक रिंगणातून माघार घेण्यासाठी बुधवार, दि. २२ रोजी शेवटचा दिवस होता. इंदापूर ब वर्ग मतदार संघातून इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने विद्यमान संचालक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला .
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गेली २५ वर्षे संचालक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काम केले आहे. यापुर्वी त्यांनी बँकेत चेअरमन म्हणून काम पाहीले आहे .
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा आलेख सतत वाढत राहीला आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा परिषद, विधानसभा यासह सध्या विविध ६ खात्यांचे राज्यमंत्री पद अशी जबाबदारी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ( मामा ) पार पाडत आहेत.
