
आप्पासाहेब जगदाळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत बिनविरोध……
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी आज बुधवार, दि. २२ रोजी शेवटचा दिवस होता .इंदापूर अ वर्ग सोसायटी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रणजित निंबाळकर यांनी माघार घेतल्याने विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला .
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली हि तिसरी निवडणूक बिनविरोध पार पडली. निरा-भिमा, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती. आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची इंदापूर अ वर्ग सोसायटी मतदार संघाची निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. त्यामुळे आप्पासाहेब जगदाळे यांनी विजयाची हॅटट्रिक साधली.
