Fri. Apr 17th, 2026

भाजपा इंदापूर पश्चिम मंडळाच्या ‘चिटणीस’ पदी अविनाश मोहिते

Spread the love

भाजपा इंदापूर पश्चिम मंडळाच्या ‘चिटणीस’ पदी अविनाश मोहिते

img 20251009 172420

राहुल बोबडे (शिव-कल्याण न्युज नेटवर्क)

रेडा : भाजपा इंदापूर पश्चिम मंडळाच्या कार्यकारणीमध्ये रुई (बाबीर) गावचे अविनाश मोहिते यांची निवड करण्यात आली.इंदापूर येथील वाघ पॅलेसमध्ये झालेल्या भाजपा पदाधिकारी व पदग्रहण मेळावा मध्ये मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.मोहिते यांना निवडीचे पत्र भाजपा दक्षिण जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणे व भाजप नेते प्रविण भैय्या माने यांच्या हस्ते देण्यात आले.

img 20251009 172541

यावेळी भाजपा पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे, मा.सभापती मयुर पाटील,भाजपा राज्य परिषद सदस्य माऊली काका चवरे,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे,राज्य कार्यकारणी सदस्य मारुती अण्णा वनवे व भाजपा इंदापूर पश्चिम तालुकाध्यक्ष तेजस देवकाते आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.इंदापूर पश्चिम तालुकाध्यक्ष तेजस देवकाते यांनी अविनाश मोहिते यांची निवड केली.

अविनाश मोहिते यांचे सामाजिक क्षेत्रातील काम चांगले आहे तसेच जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे (भारत सरकार राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त संस्था) सरचिटणीस आहेत.संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम व सामाजिक कामे केलेली आहेत.

Related Post

error: Content is protected !!