Sat. Jun 6th, 2026

पोलिसांना दंडात्मक कारवाई सह वाहन ताब्यात घेण्याचे अधिकार

Spread the love

पोलिसांना दंडात्मक कारवाई सह वाहन ताब्यात घेण्याचे अधिकार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीमध्ये फौजदारी प्रक्रिया सहिता 1973 चे कलम 144प्रमाणे पोलिसांना दंडात्मक कारवाई सह वाहन ताब्यात घेण्याचे अधिकार पोलिसांना देत असल्याचे आदेश आज पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या अधिसूचनेनसार व फौजदारी दंड प्रकिया सहिंता 1973चे कलम 144(1,)(,2)अन्वये पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीमध्ये कोविड 19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने ,पुणे जिल्हा ग्रामीण हद्दीमध्ये कोणी नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय , कारणाशिवाय. फिरत असल्याचे आढलून आल्यास त्यांचेवर 500रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार पोलिस अधिक्षक,पुणे ग्रामीण यांनी नेमलेल्या पथकास देण्यात येत आहेत.तसेच या हद्दीतील कोणत्याही नागरिकाने अत्यावश्क कामाशिवाय कारणाशिवाय फिरण्यास वापरलेले वाहन
लाॅकडाऊन संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापन कायदा लागू असे पर्यंत ताब्यात घेण्याचे अधिकार पोलिस विभागास देण्यात येत असल्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती ,संस्था आणि संघटना विरूद्ध भारतीय साथरोग अधिनियम 1897,भारतीय दंड संहिता (45ऑफ1860,)कलम 188आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियम अन्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांचे आवाहन •••

इंदापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावातील नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे असे आवाहन इंदापूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी केले आहे.

Related Post

error: Content is protected !!