हिंदू कोड बिल ” हा डाॅ बाबासाहेब आंबेडकर लिहिलेला कायदा म्हणजे भारतीय स्ञी मुक्तीचा जाहीनामाच ! – सरपंच सौ सुनिता देवकर
संतोष भोसले ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
रेडा दि ६ (प्रतिनिधी) ” हिंदू कोड बिल ” हा डाॅ बाबासाहेब आंबेडकर लिहिलेला कायदा म्हणजे भारतीय स्ञी मुक्तीचा जाहीनामाच ! असल्याची माहिती रेडा गावच्या सरपंच सौ सुनिता देवकर यांनी दिली तर,
आंबेडकर यांनी ” बौध्द धंम्माचा स्वीकार म्हणजे धंम्मक्रांतीच ” असे प्रतिपादन पोलीस पाटील सौ ज्योती भोसले यांनी केले!
रेडा ( ता इंदापुर ) येथील ग्रामपंचायत कार्यालयत आज सोमवार दि ६ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता ६५ वा महापरिनिर्वाण दिन साजरा झाला यावेळी सरपंच सौ सुनिता देवकर बोलत होत्या यावेळी पुढे म्हणाल्या की डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्ञीयाचा आदर केला त्यांना समाजामधे पुरूषांच्या बरोबरीने प्रतिष्ठा मिळवून दिली हिंदू कोड बिलांची मांडणी करीत असताना बिल मंजूर होउ नये म्हणुन परंपरावादी लोकांनी जोरदार प्रयत्न केले परंतू बाबासाहेब माञ मागे हटले नाही स्ञियाच्या हक्कासाठी त्यांनी मंञीपदाचा त्याग केला व स्ञियांच्या उन्नतीसाठी अनेक कायदे केले हे विसरणार नाही असे म्हणून डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले .
यावेळी पोलीस पाटील ज्योती भोसले म्हणाल्या की ज्या धर्मात विषमता आहे, भेदाभेद , उच्चनीचता आहे तो धर्म खरा नव्हे ती एक बंदिस्त चौकट आहे यातून कधीही मानवी कल्याण होणार नाही म्हणून डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धंम्माचा स्वीकार केला व नव्या मानवतावादी विचाराची मांडणी करून त्यामधून त्यांनी आपले भारतीयत्व जपले आणी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्नही केला असे शेवटी पोलीस पाटील ज्योती भोसले यांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयत ६५ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करताना डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच सचिन देवकर, ग्रामपंचायत सदस्य प्रभावती देवकर, युवानेते नानासो देवकर, तुकाराम सोनटट्टके, धोंडीराम कांबळे, भारत देवकर, सोमेश्वर देवकर, राजेंद्र देवकर, दत्ताञय पवार, रणधीर भोसले, गणपत जाधव, उमेश देवकर, सह आदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन प्रास्ताविक ग्रामपंचायत कर्मचारी गणेश वाघ यांनी केले तर आभार ग्राम रोजगार सेवक बाबासो पवार यांनी मानले.
