Thu. Apr 23rd, 2026

तरंगफळ येथे जागतिक अपंग दिन मोठ्या उत्सवात साजरा स्व : राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय अपंग संस्थेचे काम कौतुकास्पद : शितलदेवी मोहिते पाटील

Spread the love

तरंगफळ येथे जागतिक अपंग दिन मोठ्या उत्सवात साजरा
स्व : राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय अपंग संस्थेचे काम कौतुकास्पद : शितलदेवी मोहिते पाटील

शिव-कल्याण न्युज माळशिरस प्रतिनिधी

तरंगफळ ता. माळशिरस येथे सालाबाद प्रमाणे स्वर्गीय राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय अपंग संस्था तरंगफळ यांच्या वतीने गेली अनेक वर्षापासून ३ डिसेंबर हा जागतिक अपंग दिन साजरा केला जातो. यावर्षीही जागतिक अपंग दिनाचा कार्यक्रम श्रीनाथ विद्यालय तरंगफळ येथे घेण्यात आला. गेले दोन वर्षे शाळा बंद होती नुकतीच शाळा सुरू झाल्याने मुले आनंदात होती . शितलदेवी मोहिते पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच गोष्ट सांगून गोष्टीतून मुलांचे मनोधैर्य वाढवले तसेच कोरोना अजून संपला नाही तरी सर्वांनी काळजी घ्यावी असे आव्हान त्यांनी केले.प्रमुख पाहुणे अध्यक्षा डॉटर्स अँड मॉम फाउंडेशन शितलदेवी मोहिते पाटील व माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही,पेन,पेन्सिल व खाऊचे वाटप करून अपंग दिन साजरा करण्यात आला .

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली .यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुजित तरंगे यांनी केले. २००४ साली या कार्यक्रमाला सुरुवात मदनसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून आजपर्यत चालू आहे . तरंगफळ गावात कायदेविषयक शिबिर आयोजित केली जातात तसेच विद्यार्थ्यांसाठी पण मार्गदर्शन शिबीर आयोजित केली जातात यात स्व राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय अपंग संस्थेचे मोठे सहकार्य असते.

या कार्यक्रमासाठी जि प सदस्या जि प सोलापूर,अध्यक्षा डॉटर्स अँड मॉम फाउंडेशन शितलदेवी मोहिते पाटील, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड ,व्हा चेअरमन रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादक सह संघ अकलूज हणमंतराव सरगर , अध्यक्ष स्व राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय अपंग संस्था गोरख जानकर, बीज उत्पादक सहकारी संघाचे संचालक सुजित तरंगे ,स्वस्त धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष महादेव तरंगे ,माजी उपसरपंच सतीश कांबळे ,सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब तरंगे ,अण्णासाहेब नरोटे, सर्जेराव पिंगळे ,मुख्याध्यापक महादेव शेटे, झिंबल सर, मोहोळकर सर अविनाश तरंगे ,जगुबाई जानकर ,अहिल्या पाटील सरतापे मॅडम कुलदीप जानकर मधुकर तरंगे इत्यादी सह प्रतिष्ठित मान्यवर व अपंग बांधव शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आभार माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष निनाद पाटील यांनी केले

Related Post

error: Content is protected !!