पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन पुणे तर्फे ॲडव्होकेट डे साजरा
शिव-कल्याण न्युज नेटवर्क
स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती व प्रथितयश वकील बाबू राजेंद्र प्रसाद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून साजरा होणारा ‘ॲडव्होकेट्स डे’ येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयातील वकील संघटना असलेल्या पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन पुणे तर्फे जल्लोषात साजरा करण्यात आला. वकील कक्षात झालेल्या समारंभात संघटनेचे ज्येष्ठ वकील ॲड. दिलीप हांडे, ॲड. पराग एरंडे, ॲड. मुकुंद आगलावे व ॲड. रंगनाथ ताठे यांचे हस्ते केक कापण्यात आला. तद्नंतर वकील म्हणून काम करत असताना पक्षकार, त्यांचे कामाप्रती वकिलांची निष्ठा व न्यायव्यस्थेचा सन्मान राखून कर्तव्य बजावण्याच्या प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. महिला वकील ॲड. गायत्री पंडित, ॲड. अश्विनी नलावडे, ॲड. संतोषी पासलकर, ॲड. कल्याणी टेंबेकर, ॲड. भाग्यश्री एरंडे, ॲड. अश्विनी ठाकरे यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला . या कार्यक्रमाचे आयोजन सचिव ॲड. सुनिल मोरे यांनी केले.
——————————–
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात वकिलांचे योगदान अतुल्य आहे. वकील म्हणून राज्यघटनेचा अत्युच्च सन्मान राखून आपल्या आशिलांचे हितास सर्वोच्च प्राधान्य देणे हे वकिलांचे आद्यकर्तव्य आहे. त्याचे सातत्याने स्मरण ठेऊन ‘यतो धर्मोस्ततो जय:’ हे भारतीय न्यायव्यवस्थेचे ब्रीद सार्थ करणे हेच वकीलांचे ध्येय असायला हवे.
ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार
अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे
