मामांचे गणरायाला साकडे, हे गणराया माझ्या इंदापुरात पाऊस पडून सुख समृद्धी नांदू दे !
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी गणरायाच्या प्राणप्रतिष्ठाची स्थापना…
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
आज गणरायाचे आगमन झाले असून संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाच्या सावटाखाली गणेश उत्सव साजरा केला जात असल्याने बाप्पाच्या आगमनावेळीचा जल्लोष यावर्षी मात्र पाहायला मिळणार नाही.
मात्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांच्या इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील निवासस्थानी अगदी साध्या पध्दतीने गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली.
यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, माझ्या महाराष्ट्र राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे ! तसेच इंदापूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस होऊन सुख समृद्धी नांदू दे! असे त्यांनी गणरायाला साकडे घातले.
भरणेवाडी येथील गणरायाच्या प्राणप्रतिष्ठे वेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे सह कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
