कळंब-भोरकरवाडीत गौरी-गणपती समोर महिला सक्षमीकरणाचा देखावा
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
कळंब-भोरकरवाडी (ता.इंदापूर ) येथील गायत्री दिपक रणमोडे, स्नेहा जाधव, दिपाली, अश्विनी, पुनम, नेहा, नंदिनी, ॠतुजा रणमोडे परिवाराने गौरी-गणपती समोर महिला सक्षमीकरणाचा देखावा सादर केला.
यामधील महिला राष्ट्रपती,पहिली महिला शिक्षक, महिला न्यायाधीश, महिला वकील, महिला पोलीस, महिला डॉक्टर, महिला इंजिनिअर देखाव्यात महिला कार्यक्षम असल्याचे दाखविण्याचा रणमोडे परिवाराने केलेला प्रयत्न सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
