कर्मयोगी कै.नथू पवार यांच्या पुतळ्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते अनावरण
( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )
मौजे रेडणी येथील प्रगतशील बागायतदार व नंदीवाले समाजाचे नेते कर्मयोगी कै.नथू पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्याचे बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते होत आहे.
रेडणी तालुका इंदापूर येथे 06सप्टेंबर2021रोजी सकाळी 8वाजता होणार असल्याचे सचिन काळे व तानाजीराव पवार यांनी सांगितले.
कर्मयोगी कै नथु पवार यांनी त्यांच्या आयुष्यभरात वडापुरी येथे अंबाजी लिंबाजी मंदिर,राम मामा मंदिर,याचे बांधकाम त्यांनी केले,नंदीवाले समाजाचे ते एक आदर्श होते, इंदापूर व इतर जिल्ह्यातील नंदीवाले समाजातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा लौकिक होता.
पंच धातू पासून बनिविलेल्या हा पुतळा असून त्याची उंची सात फूट आहे,रेडणी गावच्या पंचरत्न निवासस्थानी हा पुतळा उभारला असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते या पुतळ्याचे अनावरण होत आहे.
