Thu. Apr 23rd, 2026

वक्तव्याचे समर्थन नाही, पण कारवाईविरोधात पक्ष पाठीशी – देवेंद्र फडणवीस

Spread the love

वक्तव्याचे समर्थन नाही, पण कारवाईविरोधात पक्ष पाठीशी –
देवेंद्र फडणवीस

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही,
त्यांनी संयम दाखवायला हवा होता,
असे प्रतिपादन करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या बेकायदा कारवाई विरोधात मात्र भा.ज.पा. राणेंच्या पाठीशी ठामपणे असल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अन्य भा.ज.पा. नेत्यांविरोधात ‘ लाथा घाला, ‘ अशा शिवराळ भाषेत वक्तव्ये केली आहेत.
त्यांची भाषा म्हणजे ‘ठाकरी बाणा‘ आणि इतरांनी तशी वापरली,
तर जीभ घसरली म्हणायचे,
ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका  असल्याची टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव असल्याचे माहीत नसावे,
ही बाब एखाद्याला संतापाची वाटू शकते.
पण तो संयमाने व्यक्त करण्याची एक पद्धत असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले,
राणे यांचे वक्तव्य हा दखलपात्र गुन्हाच नाही.
तरी तो दखलपात्र ठरविताना राणे यांची बाजू ऐकून घेण्यात आलेली नाही.
नाशिक पुणे व अन्यत्र एकाच बाबीसाठी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले.
नाशिकचे पोलिस आयुक्त स्वत:ला छत्रपती समजत असावेत,
असे त्यांचा अटकेचा आदेश वाचून वाटते.
शर्जील उस्मानी याने भारतमाता व हिंदूंविरोधात वक्तव्ये करुनही त्याच्याविरोधात कारवाई होत नाही.
मात्र राणेंविरोधात ती लगेच होते,
हा सत्तेचा दुरुपयोग आहे.
मे. सर्वोच्च व उच्च न्यायालयाने थपडा मारुनही राज्य सरकार सुधारलेले नाही.
राज्यात कायद्याचे राज्य राहिलेले नाही,
सरकार पोलिसांच्या जीवावर दडपशाही करीत आहे,
अशी टीका करुन फडणवीस यांनी भा.ज.पा. कार्यालयांवर हल्ले केल्यास ते सहन केले जाणार नाही,
असा इशारा दिला.

Related Post

error: Content is protected !!