Wed. Apr 29th, 2026

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त शेतकरी चर्चा सत्र व नॅनो युरियाचा वितरण शुभारंभ मानकरवाडी येथे संपन्न

Spread the love

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त शेतकरी चर्चा सत्र व नॅनो युरियाचा वितरण शुभारंभ मानकरवाडी येथे संपन्न

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंडियन फार्मर्स फर्टीलायझर्स आयोजित खतांचा संतुलीत वापर या विषयावर शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला . कार्यक्रमाचे निमंत्रक तानाजी बापू थोरात यांनी या कार्यक्रमाचे प्रवास्तिक करून शेतकर्यांना मार्गदर्शन केले. कमी कालावाधीमाध्ये कार्यक्रमाचे आयोजन करून सुद्धा कार्यक्रमाला कोरोनाचे सर्व नियम पाळून शेतकऱ्यांनी फार मोठी उपस्थीती दाखवली . माती व पाणी परिक्षणानुसारच शेतकऱ्यांनी शेतामध्ये खताचा वापर करावा असे आवाहन तानाजी बापू थोरात यांनी केले. नियोजनबद्ध पद्धतीने शेती केल्यास शेती सुद्धा फायद्याची ठरू शकते असे सांगून फायद्याच्या शेतीचा मंत्र तानाजीबापुनी यावेळी शेतकर्यांना दिला.
यानंतर मंडल कृषी अधिकारी वाघमोडे साहेब यांनी सरकारच्या विविध शेतीविषयक अनुदानाच्या योजना शेतकर्यांना सांगितल्या. इफकोचे अधिकारी श्री अमोल शेंडगे साहेब यांनी इफको कंपनीची वाटचाल व खतांच्या अनुदानावर भाष्य करून संतुलीत शेतीबाबत मार्गदर्शन व नँनो युरिया टेक्नॉलॉजी बद्धल शेतकर्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले व शेतकर्यांनी शेतीच्या बाबतीत आधुनिकतेची कास धरावी असे आवाहन केले.
यावेळी शेतकर्यांनमधून श्री छत्रपती सहकारी साखर कारखानायचे माजी व्हाईस चेरमन श्री . बाळासाहेब पाटील, शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशअध्यक्ष अमरदादा कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सोनाली फर्टीलायझर्सचे शेतकऱ्यांप्रती योगदान व सहकार्याची भावना व एकाच छताखाली शेतकर्यांना सर्व शेतीउपयोगी साहित्य व अवजारे उपलब्ध करून दिल्याबाद्धल तानाजीबापुंचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्केट कमिटीचे माजी चेरमन विलासअण्णा माने होते. शेतकर्यांना सोडत पद्धतीने नँनो युरियाचे व बियाणे कीट चे वाटप करण्यात आले. यावेळी अशोकराव पाटील, शिवाजीराव रुपनवर, लालासाहेब सपकळ, रवी यादव , दिलीप भोसले , कृषी अधिकारी महारनोर साहेब, तानाजीराव जाधव , विश्वास पाटील, दिलीप थोरात, मधुकर जाधव साहेब, अनिल देसाई , सिद्धेश्वर थोरात, दत्तात्रय कदम , पांडुरंग कदम, संभाजी कणसे इ मान्यवर व बहुसंख्य शेतकरी वर्ग उपस्थित होता, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल रुपनवर पाटील यांनी केले . आभार प्रदर्शन धर्मेश थोरात यांनी केले.

Related Post

error: Content is protected !!