अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा हायकोर्टाकडून रद्द!
सचिन तरंगे ( शिव कल्याण न्यूज नेटवर्क )
इयत्ता अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे. इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असं उच्च न्यायालयानं सांगितलं आहे. सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.
४८ तासांत विद्यार्थ्यांना माहिती द्या
राज्य सरकारनं ४८ तासांत निकालाची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी, असंही निर्देश कोर्टानं दिले आहेत.
तसेच पुढील सहा आठवड्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधीच्या सुनावणीत राज्य सरकारकडून आशुतोष कुंभकोणी यांनी सीईटी परीक्षा घेण्यासंदर्भात राज्य सरकारची बाजू मांडली होती.
