प्रशासनातर्फे फलटण मधील नागरिक, व्यापारी, दुकानदार यांना जाहीर आवाहन
श्रीकृष्ण सातव,फलटण प्रतिनिधी :
फलटण शहरातील तमाम नागरीक, व्यापारी, दुकानदार, हातगाडे धारक यांना कळविण्यात येते की, सद्यस्थिती मध्ये सातारा जिल्हा काेराेना १९ मध्ये तिसऱ्या स्तरामध्ये असलेने मा. जिल्हाधिकारी साे, सातारा यांचे आदेशानुसार फलटण शहरातील सर्व आस्थापना, व्यवहारे हे आठवड्याचे साेमवार ते शुक्रवार पर्यंत दररोज सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत सुरू ठेवणे, (मेडिकल,व वैद्यकीय सेवा वगळता) बाबत आदेश आहेत. फलटण तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या विचारात घेता वरिष्ठांच्या निदेशानुसार उद्या दि ५ ऑगस्ट पासून पोलीस प्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांची दु. ४ नंतर संयुक्त मोहीम राबवणार आहेत.तरी दु. ४ नंतर काेणाचेही दुकान, आस्थापना, हातगाडे सुरू राहीलेचे दिसून आलेस संबंधित दुकान, आस्थापना ७ दिवसांकरिता पुर्णतः सिल केले जाईल. हातगाडे जप्त केले जातील याची नाेंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे नम्र आव्हान संजय गायकवाड मुख्याधिकारी आणि भारत किंद्रे ,पोलीस,निरीक्षक फलटण यांनी केले आहे.
