पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भा.ज.पा.चे सर्व आमदार करणार मुख्यमंत्री सहायता निधीला मदत
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्र पावसामुळे अनेक ठिकाणी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
महापूर, भूस्खलनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले.
राज्याती स्वयंसेवी संस्थासह अनेक नागरिकांनी आपापल्या परीने आपत्तीग्रस्तांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
अशातच राज्यातील भारतीय जनता पक्षातर्फे एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
भा.ज.पा.चे सर्व आमदार आता पूरग्रस्तांना मदत करणार आहेत.
राज्यात निर्माण झालेली पुर परिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भा.ज.पा.च्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भा.ज.पा. नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली आहे.
“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भा.ज.पा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पक्षाच्या झालेल्या बैठकीत भा.ज.पा.च्या दोन्ही सभागृहातील आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा आम्ही निर्णय आम्ही केला आहे,”
असे आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
त्यानुसार भा.ज.पा.च्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व सदस्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करुन घ्यावे व पुरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत शासनाने करावी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
