“भास्कर जाधव, कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”;
म.न.से.चा इशारा
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिपळूण शहराचा दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.
यावेळी त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांना धीर देताना पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची सर्वकष योजना जाहीर केली जाईल असंही सांगितलं.
मात्र मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामधील एका घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि खास करुन शिवसेनेला चांगलच धारेवर धरलं आहे.
शिवसेनेचे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच केलेल्या दमदाटीमुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने, कोकणी माणूस आगामी निवडणुकीमध्ये भास्कर जाधवांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,
असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री व्यापाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच एका महिलेने ओक्साबोक्शी रडत तिची वेदना मांडली.
‘‘पुराचे पाणी माझ्या घराच्या छतापर्यंत पोहोचले.
त्यात सर्वकाही वाहून गेले.
तुम्ही काहीही करा,
पण आम्हाला मदत करा.
मदत केल्याशिवाय जाऊ नका हो’,
अशी विनवणी तिने केली.
मुख्यमंत्र्यांनीही या महिलेपुढे हात जोडत मदतीची ग्वाही दिली.
मात्र यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत असणाऱ्या भास्कर जाधव यांनी या महिलेच्या मुलालाच आईला समजाव असं मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितलं.
तसेच पुढे जताना त्यांनी या महिलेच्या मुलाला भेट असंही दमदाटी केल्याच्या स्वरात सांगितल्याचं कॅमेरांनी टिपलं.
या संपूर्ण प्रकरणाचा व्हि.डी.ओ. व्हायरल झाल्यानंतर आता म.न.से.च्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन भास्कर जाधावांना इशारा दिला आहे.
