रेडणीत “माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक”,
शेतकऱ्यांनी मातीचे आरोग्य तपासण्याची गरज- कृषिकन्या काजल हाके
( शिव कल्याण न्यूज नेटवर्क )
रेडणी ( ता. इंदापूर) :- माती परीक्षण ही काळाची गरज असून कोरोना महामारी च्या काळात आपण ज्या प्रमाणे आपल्या आरोग्याची काळजी घेतो, त्याप्रमाणे जमीनीच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्या साठी प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतजमिनीतील मातीची आरोग्य तपासणी करणे अत्यावश्यक आहे.
. रत्नाई कृषी महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु. हाके काजल सयाजीराव हिने रेडणी गावातील विविध शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले,त्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे,समन्वयक डॉ.डी.पी.कोरटकर कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत ,प्रा.ए.बी.तमनार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण कृषी कार्यानुभवांतर्गत शेतकर्यांना माती परीक्षणाविषयी माहिती दिली.
रेडणी येथील श्री.नानासाहेब नथु पवार यांच्या शेतात प्रात्यक्षिक करून कृषीकन्येने माती परीक्षणाचा मुळ उद्देश हा जमिनीत पीक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे, हे तपासणे व ती भरुन काढण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केले.
यामध्ये तिने शेतकर्यांना मातीचा नमुना कसा घ्यावा, नमुना घेतना कोणती काळजी घ्यावी… म्हणजे कोणत्या ठिकाणी घ्यावा, कोणत्या ठिकाणी घेऊ नये, मातीची उत्पादकता वाढविण्यासाठी करायचे उपाय, आवश्यक अन्नघटक व त्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणे याविषयी मार्गदर्शन केले.
काजल हाके चे कौतुक –
रेडणी गावात शेतकऱ्याच्या बांधावर व शेतात जाऊन गावची कन्या काजल हाके हिने “माती परीक्षण”विषयी जागृती अभियान राबविले,या तिच्या अभियानाने शेतकरी प्रोत्साहित झाले व तीचे कौतुक या परिसरात व शेतकरी वर्गात होत आहे .
