*पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया कराच,अन टाळा किडींचा संभाव्य धोका: कृषी कन्या दिपाली भोसले*
सचिन तरंगे ( शिव कल्याण न्युज नेटवर्क )
रेडणी(इंदापूर):येथेमहात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी अंतर्गत अकलूजच्या रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे विशेषतः शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यक्रम 2021-22 चे आयोजन करण्यात आले,तरी या उपक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे समन्वयक-डॉ.डी.पी.कोरटकर,प्राचार्य-आर.जी.नलवडे,कार्यक्रम समन्वयक-प्रा.एस.एम.एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी-प्रा.एस.आर.आडत, प्रा.ए. बी तमनार व प्रा.डी.एस.मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकण्या दिपली भोसले यांनी शेतकऱ्यांना ,बीजप्रक्रियेबद्द्ल माहिती दिली व मका पिकाच्या पेरणी आधी कॅप्टन या जैविक बुरशीनाशकाच्या वापर बद्द्ल प्रात्यक्षिक करून दाखवले यामध्ये साधारण एक किलोस 1.5 ग्रॅम बुरशीनाशक वापरतात असे त्यांनी सांगितले, यावेळी त्यांनी बीजप्रक्रियेमुळे जमिनीतुन व बियाणाद्वारे पसरणारया रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.बियाण्याची उगवण क्षमता वाढते,रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात.पिकाच्या उत्पादनात वाढ होते .कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मकउपाय करून पेरणी करता येते अशी माहिती सांगितली याप्रसंगी शहाजी पाटिल,काशिनाथ रुपनवर ,ज्ञानेश्वर तरंगे उपस्थित होते.
