Mon. Apr 27th, 2026

मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र

Spread the love

मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मुंबई : महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी  सहकार्य करावे,
असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.
मराठा आरक्षण प्रकरणी मे.सर्वोच्च न्यायालयाने पाच मे २०२१ रोजी दिलेला निकाल व त्याअनुषंगाने निर्माण झालेली कायदेशीर परिस्थिती चव्हाण यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे.
१०२ व्या घटना दुरुस्तीबाबत केंद्र सरकारची पूनर्विलोकन याचिका मे.सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक जाहीर करण्याचे अधिकार पुन:श्च राज्यांना बहाल करण्यासाठी केंद्र सरकार संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची शक्यता आहे.

Related Post

error: Content is protected !!