Wed. Apr 29th, 2026

शिल्पा शेट्टीही अडकणार ? व्हि.डी.ओ.मुळे अडचणी वाढण्याची शक्यता

Spread the love

शिल्पा शेट्टीही अडकणार ? व्हि.डी.ओ.मुळे अडचणी वाढण्याची शक्यता

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक करण्यात आलेल्या अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणामध्ये आता शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली जाणार आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दुपारी साडेचारच्या सुमारास जुहू येथील शिल्पा आणि राज यांच्या घरावर छापा टाकला.
मे.मुंबई जिल्हा न्यायालयाने राज कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीमध्ये पाच दिवसांनी वाढ करुन ती २७ जुलैपर्यंत वाढून दिल्यानंतर पोलीस कुंद्रा यांना घेऊन थेट त्यांच्या घरी दाखल झाले.
या ठिकाणी शिल्पा आणि कुंद्रा यांना समोरासमोर बसवून पोलिसांकडून चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आता हॉटशॉर्ट अ‍ॅपबरोबरच राज कुंद्रांच्या मालकीच्या आणखीन एका वेबसाईटसंदर्भातील तपास सुरु केलाय.
कुंद्रा यांच्या जेएल स्ट्रीम्स या कंपनीने सुरु केलेल्या एका वेबसाईटचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार शिल्पा शेट्टीने या वेबसाईटसाठी एक जाहिरातही शूट केली होती.
पाच महिन्यांपूर्वी शिल्पाने या वेबसाईटसाठी प्रमोशनल व्हि.डी.ओ. शूट केलेले.
या वेबसाईटवरही अडल्ट कंटेट उपलब्ध असून ही वेबसाईट अद्यापही भारतामधून सुरु असल्याचं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
त्यामुळेच आता ही जाहिरात आणि या कंपनीशी शिल्पा शेट्टीचा काय संबंध आहे ?
याबद्दल पोलिसांकडून चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Related Post

error: Content is protected !!