पावसाचा तडाखा! पूल गेला वाहून, चालकाचा मृत्यू;
उसरोली नदीला पूर
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
रायगड जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा तडाखा बसला असून,
सरासरी ८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मुरुड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून,
तालुक्यात २४ तासांत तब्बल ३४८ मिलीमीटर पाऊस पडला.
अतिवृष्टीमुळे काशिद येथे पूल वाहून गेला असून,
या दुर्घटनेत एक वाहन चालक वाहून गेला आहे.
त्याचबरोबर राजपूरी आणि कळवटे येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
तर उसरोली नदीलाही पूर आल्याने सुपेगाव मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली.
किनारपट्टीवरील भागात पावसाचा जोर दिसून येत आहे.
मुरुड, श्रीवर्धन तालुक्यात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.
मुरुड येथे ३४८ मिमी,
श्रीवर्धन येथे २१० मिमी,
माथेरान येथे २१४ मिमी,
तर तळा येथे १३१ मिमी
पावसाची नोंद झाली आहे.
मुरुड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अलिबाग मुरुड मार्गावरील जुना पूल रात्री वाहून गेला.
यात पुलावरील वाहनंही वाहून गेली.
रायगड जिल्ह्यात सोमवारी पावासाने जोरदार हजेरी लावली.
मुरुड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून,
तालुक्यात २४ तासांत तब्बल ३४८ मिलीमीटर पाऊस पडला.
राजपूरी आणि कळवटे येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
या दुर्घटनेत एकदरा येथील विजय चव्हाण यांचा मृत्यू झाला.
तर अन्य सहा जणांचे जीव थोडक्यात बचावले.
रोहा तालुक्यात केळघर रोडवर कळवटे आदिवासी वाडीजवळ दरड कोसळली.
त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे.
राजपुरी येथे एका झोपडीवर दरड कोसळली.
सुदैवाने यात कोणीतीही जीवितहानी झाली नाही.
