Thu. Apr 30th, 2026

बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया डी.टी.ई.च्या संकेतस्थळावर

Spread the love

बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया डी.टी.ई.च्या संकेतस्थळावर

श्रीकृष्ण सातव ( फलटण तालुका प्रतिनिधी )

राज्यात बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाने (डी.टी.ई.) सुरू केली आहे. त्यानुसार औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन आणि खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करण्यासाठी मुदत २ ऑगस्ट आहे.
डी.टी.ई.कडून बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. या पूर्वी दहावीनंतरच्या तंत्रनिकेतनच्या प्रवेशांसाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. आता बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रक्रियेची माहिती डी.टी.ई.ने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत १० जुलै ते २ ऑगस्टदरम्यान ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांच्या छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे, ५ ऑगस्टला तात्पुरती गुणवत्ता यादी, या यादीवरील हरकतींसाठी ६ ते ८ ऑगस्ट अशी मुदत आहे. तर १० ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल, असे ‘डी.टी.ई.’ने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Related Post

error: Content is protected !!