“पोलिस सहकाऱ्याला” मारहाण करणाऱ्या ” पोलिसाचे निलंबन”!
सचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)
आपल्या ड्युटीची जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जात “पोलीस कर्मचाऱ्याला” भररस्त्यात शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या “एका पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन” करण्यात आले.
10 मे रोजी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पौड रस्त्यावर हा प्रकार घडला.
विजयकुमार सुभाष पाटणे असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
त्याने श्रावण शेवाळे या पोलिस करमाचा ऱ्याला मारहाण केली होती.
सदर प्रकरणाची मिळालेली माहिती अशी की, हे दोन्ही कर्मचारी पोलीस शिपाई असून कोथरूड पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत.
10 मे रोजी पोलिस सुभाष पाटणे याने कर्तव्य नेमून दिलेल्या ठिकाणाहून पौड रस्त्यावर जात पोलीस शिपाई श्रावण शेवाळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
सदरच्या प्रकरणाची पोलिस दलात चर्चा आहे
