माजी मंत्री सुबोध मोहिते चा “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत”किती दिवस मुक्काम?
सचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)
शिवसेनेचे माजी नेते म्हणून ओळख असलेल्या सुबोध मोहिते यांच्या विविध पक्षातील “पक्ष प्रवेशावर”राजकीय चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील परंतू नागपुरात सक्रिय असलेल्या सुबोध मोहिते यांचे या पक्षातून त्या पक्षात सतत होणारे पक्ष प्रवेश चर्चे चे झाले आहेत.
सुबोध मोहिते यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली आणि ती आता कालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश झाल्याने विसावली आहे.
सुबोध मोहिते हे शिवसेनेत असताना त्यांचा त्यांनी रामटेक या मतदार संघातून निवडणूक लढवून खासदार झाले,तसेच ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने केंद्रात मंत्रिपद मिळाले होते.
ते ज्या मतदार संघाचे लोकप्रतिनिधित्व करीत होते तो मतदार संघ च आरक्षित झाल्याने त्यांनी रामटेक या विधानसभेच्या मतदार संघातून निवडणूक लविण्याचे निश्चित केले.त्या साठी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला,आणि विधानसभा निवडणुक लढविली ,परंतु या राजकीय लढतीत त्यांना अपयश आले,त्यांना काँग्रेस कडे जाऊनही मतदार संघ ताब्यात घेता आला नाही.
त्या नंतर सुबोध मोहिते यांनी राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी “शिवसंग्राम”पक्षात प्रवेश करत शिवसंग्राम पक्षात काम करण्यास सुरुवात केली.
या वर ही सुबोध मोहिते चे मन चल बीचल करीत होते,शिवसंग्राम मध्येही ते थांबले नाहीत,शेवटी ते “स्वाभिमानी शेतकरी पक्षात”दाखल झाले.या ही पक्षात त्यांच्या वाट्याला नाराजी आली,त्या ही पक्षात ते थांबले नाहीत.
शेवटी त्यांनी कोणत्याही निवडणुका जवळ नसताना त्यांनी “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत”राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला,
त्यांच्या शिवसेना,काँग्रेस,शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी पक्ष,आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त पक्ष प्रवेश यामुळे माजी मंत्री सुबोध मोहिते यांचे “पक्ष प्रवेश”चांगलेच चर्चेत आले आहेत.
त्यांचा हा पक्ष प्रवेश व “राजकीय मुक्काम”राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत”किती दिवस राहणार याची राजकीय चर्चा जोरात आहे.
