भिगवण येथे चक्का जाम आंदोलन
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील OBC चे आरक्षण नुकतेच सरकारच्या उदासीनते मुळे रद्द झाले.अशातच काही जिल्ह्यात पोटनिवडणुका लागल्या आहेत.हे समस्त OBC च्या साठी दुर्दैवी आहे या पोटनिवडणुकीना विरोध करत सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष तथा इंदापूर तालूका भाजपा च्या वतिने राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.इंदापूर तालुक्यातील मौजे भिगवन येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले या प्रसंगी राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब,रंगणाथजी देवकाते,मारूती वणवे, किसन मोर्चा चा प्रदेश सदस्य माउली चौवरे,भारतीय जनता पक्ष भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस तथा प्रभारी पुणे जिल्हा व सोलापूर जिल्हा गजानन वाकसे, इंदापूर तालूका अध्यक्ष शरद जामदार,भटके विमुक्त आघाडी चे अशोक वणवे,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पानसरे,आणूसूचीत मोर्चा प्रदेश सचिव संतोष कांबळे,भिगवण सरपंच पराग जाधव,मदनवाडी उपसरपंच तेजस देवकाते,युवा मोर्चा प्रदेश सदस्य आकाश कांबळे,सुयोग सावंत,मयुर दादा पाटील,उपसरपंच संजय देहाडे,दिनेश मारणे,कर्मयोगी संचालक वसंत मोहोळकर, अॅड.कृष्णाजी यादव,जिल्हा परिषद सदस्य मोहन दुधाळ व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच वाकसे, शिदे,ढोले,वणवे,चौवरे,पानसरे यांनी मनोगत व्यक्त केले .
