बहुजन परिषद संघटनेच्या वतीने महाराष्ट्राची महागायिका राधा खुडे यांचा सत्कार.
इंदापूर :
‘ सुर नवा ध्यास नवा ‘ या रियलिटी शो मधून तृतीय क्रमांकाने विजेत्या ठरलेल्या राधा खुडे यांचा सत्कार बहुजन परिषद, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने करण्यात आला.
बहुजन परिषदेचे अध्यक्ष बिभीषण लोखंडे, उपाध्यक्ष दत्ता बाबर, सरचिटणीस विजय गायकवाड, खजिनदार भगवान पासगे, तालुकाध्यक्ष अनिल मोहिते, तालुका उपाध्यक्ष राजू गायकवाड, संजय कुचेकर, सुनिल आरडे, बिजू मिसाळ, आझाद मुलाणी, सुधीर लोंढे, बाळासो मिसाळ, रमेश कुचेकर, कायदेशीर सल्लागार अॅड. नारायण ढावरे, मिडीया प्रमुख दिपक खिलारे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बिभीषण लोखंडे म्हणाले, राधा खुडे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल महाराष्ट्र समाधानी असून पुढील कारकिर्दीमध्ये आपल्या यशाचे शिखर असेच उंचावत राहो.असे सांगून राधा खुडे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन मदतीचे आश्वासन दिले.
बहुजन परिषदेच्या वतीने दिनांक १ ऑगस्ट ते ८ऑगस्ट यादरम्यान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. याकरीता महागायिका राधा खुडे यांना निमंत्रित करण्यात आले असल्याचे परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता बाबर यांनी सांगितले.
