Uncategorized

..अन् पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर त्याने स्वतःला पेटवून घेतले!

…….अन् पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर त्याने स्वतःला पेटवून घेतले!nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एका व्यक्तीने पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळखळ उडाली आहे.nसुरेश विठ्ठल पिंगळेn(रा. खडकी) असे पेटवून घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,nसकाळी ११ वाजेच्या सुमारास आयुक्त कार्यालयाच्या बाहेर सुरेश पिंगळे हा तरूण काही कामासाठी आला होता.nदरम्यान, त्याने अचानक रॉकेल अंगावर ओतून स्वत:ला पेटवून घेतले.nहा प्रकार घटनास्थळी उपस्थित असलेल्यांच्या लक्षात येताच, लोकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.nघटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली व त्यानंतर जखमी अवस्थेत सुरेश पिंगळे यास ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.nसध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.nया तरुणाने पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी अर्ज केला होता.nमात्र त्याच्यावर तीन ते चार गुन्हे दाखल असल्याने,nपासपोर्ट रिजेक्ट करण्यात आला होता,nत्यातून त्याने पेटवून घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *