अकरावी प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु!nशालेय शिक्षण मंत्र्याची घोषणाnnसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )nnराज्य सरकारच्या शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले आहे.nnमुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागासाठी 11 वी प्रवेश प्रक्रिया असून, राज्यातील उर्वरित भागात महाविद्यालय पातळीवर प्रवेश होतील. असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.nnवर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील, मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील 11वीचे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत.nn14 ऑगस्ट 2021पासून सकाळी अकरा वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. 22 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु राहणार आहे.nnविद्यार्थी स्वतःचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करून हे रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत.nnतर 17 ते 22 ऑगस्टदरम्यान उपलब्ध जागांची माहिती देण्यात येणार आहे. 23 आणि 24 ऑगस्टला मेरिस्ट लिस्ट लागणार आहे,