Uncategorized

भाजपच्या पंकजा मुंडेंना धक्का; वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील

भाजपच्या पंकजा मुंडेंना धक्का; वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सीलnnसचिन तरंगेn( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )nnभाजप नेत्या “पंकजा मुंडे”अध्यक्षा असलेल्या “वैद्यनाथ सहकारी साखर” कारखान्यावर औरंगाबाद येथील ईपीएफओच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी मोठी कारवाई करण्यात आली आहे.nnकर्मचाऱ्यांचे पीएफचे १ कोटी ४६ लाख रुपये थकवल्याप्रकरणी कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे.nnकारखान्याच्या बँक खात्यावर कारवाई करूनऔरंगाबाद ईपीएफओच्या विभागीय कार्यालयाने पंकजा मुंडेंना धक्का दिला आहे.nnवैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 या काळातील कर्मचारी आणि कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची एकूण 1.46 कोटींची रक्कम थकीत होती.nnउर्वरित 56 लाख रुपयांच्या वसुलीसाठी कार्यवाही सुरु असल्याचे ईपीएफओ कार्यालयाने सांगितले आहे.nnसर्व थकबाकीदारांनी थकीत भविष्य निधी देयकांचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे.nnया कारखान्यातील सातशे कामगारांना जवळपास 19 महिने पगारच मिळाला नसल्याने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी मार्च महिन्यात कारखाना बंद केला होता.nnएकेकाळी वैद्यनाथ साखर कारखाना आशिया खंडात नावलौकिक होता.nnपंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत आहेत,त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे खासदार आहेत.nnमाजी मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांच्या मालकीच्या कारखान्यावर अशी गंभीर कारवाई झाल्याने पंकजा मुंडे अडचणीत आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *