⭕’नीट’ची परीक्षा १२ सप्टेंबरला;n⭕ केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….nnराष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट) १२ सप्टेंबर २०२१ रोजी संपूर्ण देशात घेतली जाणार आहे.nशिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.nकेंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे.nगेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षांबाबत विद्यार्थी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना याबाबत विचारत होते.nअखेर त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.nया परीक्षेसाठी अर्ज संध्याकाळी ५ वाजल्यापासून ntaneet.nic.in वर उपलब्ध असणार आहे.nयापूर्वी ही परीक्षा १ ऑगस्ट रोजी असल्याचं सांगण्यात आलं होतं.nमात्र त्यासाठी आवश्यक असणारी प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरु करण्यात आली नव्हती.nत्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षाही करोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.nवैद्यकीय आणि दंत वैद्यकीय शिक्षणसाठी ही परीक्षा पास होणं महत्त्वाचं आहे.nनीटसाठी अर्ज मिळताच नवीन परीक्षेचा पॅटर्नही जाहीर होईल,nअशी अपेक्षा आहे.nप्रत्येक विभागात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढेल.nतसेच विद्यार्थ्यांना प्रश्न निवड करता येतील.nमाहिती पत्रक आल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.nदरवर्षी या परीक्षेला किमान १४ लाख विद्यार्थी बसतात.nमात्र गेल्या काही महिन्यांपासून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी करत होते.nजगातील सर्वात महागडा बर्गर! किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क गेल्यावर्षी करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.