“गरोदर महिलांसाठी करोनावरील लस सुरक्षित”;nनिति आयोग सदस्य डॉ. पॉल यांची माहितीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnदेशात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे.nत्यामुळे देशात लसीकरणावर जोर देण्यात आला आहे.nयासाठी १८ वर्षावरील सर्वांचं लसीकरण केलं जात आहे.nगरोदर आणि स्तनदा मातांना २ जुलैपासून करोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.nअसं असलं तरी गरोदर महिलांनी लस घ्यावी,nकी नाही?nयाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले जात होते.nनिति आयोग सदस्य डॉ. वी.के .पॉल यांनी याबाबतचा संभ्रम दूर करत गरोदर महिलांनी करोनाची लस घ्यावी,nअसं आवाहन केलं आहे.nलस घेतल्याने गरोदर महिला आणि बाळाला सुरक्षा मिळेल असंही त्यांनी पुढे सांगितलं.nआतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार ही लस गरोदर महिल्यांसाठी सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं.n“गरोदर महिलांना करोनाची लागण झाली तर त्याचे परिणाम होणाऱ्या बाळावर होऊ शकतात.nयासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचना जारी केल्या आहेत.nगरोदर महिलांनी लस घेतली पाहीजे.nलसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे.nगरोदर महिलेला करोनाची लागण झाल्यास वेळेआधी प्रसुती होण्याची शक्यता जास्त आहे.nअसं एका अभ्यासातून समोर आलं आहे”,nअसं डॉक्टर पॉल यांनी सांगितलं.nगरोदर महिला कोविन अॅपवरून बुकिंग किंवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात,nअसंही त्यांनी पुढे सांगितलं.nसर्वसामान्यांनी लस घेण्यापूर्वी जी काळजी घ्यावी,nतीच काळजी गरोदर महिलांनी घेतली पाहिजे.nदेशात करोना प्रादुर्भाव सुरु आहे.nअशा काळात गरोदर माता आणि बाळांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.nगरोदर महिलांनी लस घेतल्यास संरक्षण मिळू शकते.