रणसिंग महाविद्यालयात स्वच्छता मोहिम संप्पन्नnn
nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnविश्वासराव रणसिंग महाविद्यालयात एक दिवसीय स्वच्छता मोहीमेचे आयोजन संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.nराष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विश्वासराव रणसिंग महाविद्यालय परिसर चकाचक करण्यात आला.nयावेळी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक काळंगे सर, उपप्राचार्य प्रा ज्ञानेश्वर गुळिग व डाॅ.प्रशांत शिंदे यांनी भेट दिली.nयावेळी माजी कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रशांत शिंदे सरांनी राष्ट्रीय सेवा योजना आयुष्यभराची शिदोरी देते भिंती बाहेरच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय सेवा योजना आहे तसेच डॉ अशोक काळंगे माजी कार्यक्रम अधिकारी यांनी देखील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याची माहिती सांगून एकत्र येऊन काम करताना सामाजिक बांधिलकी, नेतृत्व गुण वाढीस लागतात आणि देशाच्या समाजाच्या विकासासाठी हि योजना महत्वाची आहे, असे सांगितले.nयावेळी डॉ. संदीप पवार,प्रा.धुळदेव वाघमोडेnसमिती सदस्य डॉ अमर वाघमोडे,प्रा रवी गायकवाड,प्रा.सोमनाथ चव्हाण,प्रा महादेव माळवे प्रा.आकांक्षा मेटकरीnया कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा राजेंद्रकुमार डांगे यांनी केले.nआभार प्रा सुवर्णा बनसोडे यांनी मानले.