Uncategorized

चिपळूण तालुका हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने विविध उपक्रमाने हिंदी पंधरवडा साजरा !

चिपळूण तालुका हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने विविध उपक्रमाने हिंदी पंधरवडा साजरा!nnimg 20250925 081547nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnचिपळूण-प्रतिवर्षी प्रमाणे चिपळूण तालुका हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने 14 सप्टेंबर हा दिन “राष्ट्रभाषा हिंदी दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो तर 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत हिंदी-पंधरवडा अंतर्गत शालेय स्तरावर विविध विद्यार्थी उपक्रम व स्पर्धेचे आयोजन केले होते.nया कार्यक्रमाचे सांगता समारंभ मंगळवार दिनांक -23 सप्टेंबर 2025 रोजी युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथे उपस्थित मान्यवरांच्या समवेत संपन्न झाला.nसर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवर महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक मंडळाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सल्लागार अनिलकुमार जोशी, युनायटेड इंग्लिश स्कूलचे उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, पर्यवेक्षक रेवती कारदगे, प्रशिक्षण मार्गदर्शक मौलासो नदाफसर ,सलीमा नदाफ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. सुंदर असे स्वागत व प्रार्थना गीत युनायटेड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी गायले तर लययुक्त संगीत साथ पराग लगाटेसर यांनी दिली.nnचिपळूण तालुक्यातील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना उत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षणसेवा देणाऱ्या उपक्रमशील 15 शिक्षकांना, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.nचिपळूण तालुका अंतर्गत काव्यवाचन व्हिडिओ स्पर्धेत,nप्रथम-दूर्वा भोसले इ.7वी युनायटेड इंग्लिश स्कूल,nद्वितीय-ईश्वरी पाथरे मार्गताम्हाणे विद्यालय,nतृतीय- सृष्टी भैरवकर खदीजा इंग्लिश स्कूल, तर उत्तेजनार्थ-nस्वरा भडवळकर दलवाई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नंबर पटकावला.nकविता लेखन प्रतियोगिता स्पर्धेत तालुकास्तरीय,nसृष्टी शांताराम जाधव (प्रथम)न्यू इंग्लिश स्कूल तळसर,nस्वराली सतिश मुणगेकर (द्वितीय) परांजपे मोतिवाले हाईस्कूल,सावली विलास गुख (तृतीय) युनाइटेड रांग्लश स्कूल,nसातिका महेंद्र कदम (उत्तेजनार्थ )न्यू इंग्लिश स्कूल खडपोली तसेच निधी दिपक गांधी (उत्तेजनार्थ)वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय मार्ग ताम्हाणे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.उपक्रमशील शिक्षक कसा असावा या विषयावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन श्री नदाफ सर्व श्री निकम सर यांनी केले. तर उपस्थित मान्यवर अनिलकुमार जोशी, राजेंद्र खांबे, मिलिंद कडवईकर यांनी काळानुरूप अध्यापनात कसा बदल करावा याविषयी आपले विचार व्यक्त केले.nnयाप्रसंगी महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक मंडळाचे माझे अध्यक्ष व विद्यमान सलाहकार- अनिल कुमार जोशी, उपाध्यक्ष-राजेंद्र खांबे, रत्नागिरी जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद कडवईकर, उपाध्यक्षा मुग्धा पवार,प्रमुख मार्गदर्शक मौलासो नदाफ सर, बॅक ऑफ महाराष्ट्र मॅनेजर-श्री.धिरज बारवी, बॅक ऑफ महाराष्ट्र अधिकारी-आशिष कुमार सर ,चिपळूण नगर परिषद अधिकारी प्रसाद साडविलकर , नगर परिषदचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर,निवृत्त विस्तार रमाकांत पवार, तसेच चिपळूण तालुका हिंदी अध्यापक मंडळाचे सर्व पदाधिकारी सलीमा नदाफ, मानसी पेढांबकर, राजेश माळी, उज्वला लोखंडे, राखी भुरण, मोहन पवार, रवींद्र गुरव, शक्तीकुमार चव्हाण उपस्थित होते.nnहिंदी पंधरावडा समारोहसाठी अर्थसहाय्य ,चिपळूण नगर परिषद व बँक ऑफ इंडिया कडून लाभल्याबद्दल तसेच परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मा.विभाकर वाचासिद्ध तसेच प्रोजेक्टर ऑपरेटर म्हणून विशाल कदम, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची सहकार्य लाभले त्याबद्दल संघटना अध्यक्ष सलीमा नादाफ यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परवेज पिरजादे यांनी केले तर उपस्थित सर्व तज्ञ मार्गदर्शक, उपस्थित मान्यवर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार उज्वला लोखंडे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *