डोर्लेवाडी विद्यालयाची कु. वामन स्वामिनी गुणवत्ता यादीतnn
nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnरयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल डोर्लेवाडी येथील कु.स्वामिनी संतोष वामन हिने आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून विद्यालयाची परंपरा कायम ठेवली. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून केंद्रप्रमुख श्री.आडके साहेब जिल्हा परिषद शाळा डोर्लेवाडी व जिल्हा परिषद शाळा झारगडवाडी येथील गुरुजनांनी तिचे अभिनंदन केले.nnयाप्रसंगी विद्यालयाचे स्कूल कमिटी सदस्य तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. खाताळ सर पर्यवेक्षक श्री. मोरे सर सर्व अध्यापक यांनी तिचे कौतुक केले.