Uncategorized

डॉ. सिद्धार्थ सुनील पवार या कळंब च्या सुपुत्राने लावला दंतचिकिस्ता क्षेत्रात जगात मानाचा तुरा !

डॉ. सिद्धार्थ सुनील पवार या कळंब च्या सुपुत्राने लावला दंतचिकिस्ता क्षेत्रात जगात मानाचा तुरा !nnimg 20250628 202700nn( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )nnपुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळंब गावचे सुपुत्र डॉ. सिद्धार्थ सुनील पवार यांनी दंतचिकिस्ता क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला. व जागतिक विक्रम प्रस्थापित केला.nचेन्नई येथील नामांकित सविता मेडिकल कॉलेजमधून त्यांनी स्थिर अंशिक दंत उपचार श्रेणीत हा विक्रमी टप्पा गाठला असून, त्यांना राबा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मानांकन मिळाले आहे. डॉ. पवार यांना पदवी स्तरावर अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत सर्वाधिक स्थिर अंशिक दंतचिकिस्ता उपचार पूर्ण केल्याबद्दल हा जागतिक विक्रम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.nnत्यांचा हा विक्रम भारत आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या दोन्ही देशांमध्ये नोंदणीकृत आहे. ज्यामुळे त्यांच्या यशाचे महत्व अधिकच वाढले आहे. डॉ. सिद्धार्थ पवार यांच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे कळंब गाव आणि पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण असून, सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. त्यांच्या या यशाने केवळ कळंबच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *