छत्रपती सह.साखर कारखान्याची निवडणूक लढविणार तानाजीराव थोरात यांची भुमिका !
nnसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnतानाजीराव थोरात यांच्या भूमिकेमुळे छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणूक मध्ये नवीन ट्विस्ट. अजित दादांच्या निवडणूक बिनविरोध किंवा एकतर्फी भूमिकेला खीळ .nएकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड चुरस निर्माण होणारअसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.nतानाजीराव थोरात यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तानाजीराव थोरात हे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष असून छत्रपती च्या सभासदांसाठी सातत्याने संघर्ष करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते.nते कारखान्याचे माजी संचालक असून भाजपामध्ये त्यांची एकनिष्ट व तत्वनिष्ठ अशी वेगळी ओळख आहे . या पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय किसान मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष तानाजीराव थोरात म्हणाले कि, कारखाना बिनविरोध किंवा एकतर्फी करू म्हणून सांगता हे संसदीय लोकशाहीचे लक्षण आहे काय? कालपर्यंत पृथ्वीराज बापू अजित पवार सत्तेचा गैरवापर देत होते, तुम्ही दोघे एक झाल्याने सत्तेचा गैरवापर पृथ्वीराज जाचकांच्या दृष्टिकोनातून अचानक बंद झाला आहे काय? प्रशांत काटे यांनी जाचक यांची सगळी प्रकरणे आम्ही बाहेर काढू म्हणून सांगितले होते आता ती तुम्ही बाहेर काढणार की बासनात गुंडाळून ठेवणार? पृथ्वीराज जाचक व अजित दादा आपण दोघे भाऊ भाऊ सत्तेचा वापर फायद्यासाठी करू हेच आपणाला अभिप्रेत आहे का? पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याच्या हिताच्या विरोधी भूमिका घेतल्या हे मी वेळोवेळी सांगेनच , हौसे नवसे फॉर्म भरतील हे वाक्य आदरणीय दादा आपणासारख्या मोठ्या नेत्यांना शोभत नाही. संसदीय लोकशाहीमध्ये पात्र सभासदांना लोकशाहीने मतदानाचा व प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार दिला आहे हे आपण पद्धतशीरपणे विसरला आहेत का ? पृथ्वीराज जाचक व अजित दादा पवार निवडणुकीला एक झाले म्हणून निवडणूक एकतर्फी करू, हे दादा सभासदांना गृहीत धरल्यामुळे बोलत आहेत. कालपर्यंत जे सभासद पात्र नव्हते ज्यांच्या पात्रतेसाठी एवढे दिवस कोर्टामध्ये निवडणूक अडवून धरण्यात आली ते सभासद आपल्या दृष्टिकोनातून आज पात्र झाले का? की निवडणूक लांबवण्यासाठी तुमची नुरा कुस्ती चालू होती काय असा प्रश्न सभासदांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. गेली पाच-सहा वर्षे जाणून बुजून पृथ्वीराज बापू यांना कोर्टात लावून कारखान्याचे निवडणूक लांबणीवर टाकली काय? जाणून बुजून त्यांना विरोधात ठेवून विरोधामध्ये पोकळी निर्माण केली व सक्षम विरोधक तयार होऊन दिला नाही. निवडणुकीपर्यंत विरोधात भूमिका घ्यायची आणि एका रात्रीत उडी मारायची आणि विरोधक पूर्णपणे संपला असं दाखवायचा. पण असे होणे शक्य नाही, छत्रपतींचे सभासद सुज्ञ – जागरूक आहेत त्यांना छत्रपती सहकारी साखर कारखाना हा राजकारणापेक्षा त्यांचा स्वतःचा प्रपंच वाटतो, त्यामुळे त्याबाबतीत छत्रपतींचे सुज्ञ सभासद योग्य तो निर्णय घेतील.nयावेळी तानाजीराव थोरात , अविनाश मोटे, निलेश शिंगाडे, रामभाऊ जामदार , देवेंद्र बनकर , भीमराव भोसले, गोविंदराव देवकाते , गणेश जाधव , अभिजित देवकाते, रवींद्र यादव , संदीप मूलमुले, रघू चौधर, योगेश थोरात उपस्थित होते.