Uncategorized

पुणे सह धर्मादाय आयुक्तालयात ऑनलाइन सुविधा सुरू !  सह आयुक्त रजनी क्षीरसागर यांचे क्रांतिकारक पाऊल

पुणे सह धर्मादाय आयुक्तालयात ऑनलाइन सुविधा सुरू !nसह आयुक्त रजनी क्षीरसागर यांचे क्रांतिकारक पाऊलnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमहाराष्ट्र शासनाने १३ जानेवारी रोजी घोषित केलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार सह धर्मादाय आयुक्तालयाच्या पुणे विभागातर्फे ऑनलाइन पेमेंटसाठी क्यु आर कोड व स्टेट बँकेची पेमेंट लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.nकृती आराखड्यातील ‘सुकर जीवनमान’ (Ease of Living) प्रणालीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोघ श्यामकांत कलोती यांनी राज्यातील धर्मादाय कार्यालयांमध्ये भरण्यात येणारे सर्व शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यासाठी धर्मादाय विभागातील सर्व सह आयुक्तांना निर्देश दिले होते.nपुणे विभागाच्या नोडल ऑफिसर असलेल्या धर्मादाय सह आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी तातडीने यावर अंमलबजावणी करून नुकताच या योजनेचा शुभारंभ पुणे कार्यालयात केला आहे. या सुविधेद्वारे रक्कम अदा करून आलेली प्रथम पावती धर्मादाय उपायुक्त डॉ. राजेश परदेशी यांनी ॲड.शिवराज कदम-जहागिरदार यांना पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.मोहन फडणीस यांच्या उपस्थितीत प्रदान केली.n——————————————————-n*गतिमान व जनसामान्यस्नेही कार्यप्रणालीसाठी कटिबद्ध*nपुणे येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचा आवाका खूप मोठा असून पुणे जिल्ह्यासह सातारा, सोलापूर व अहिल्यानगर जिल्हे अंतर्भूत होतात. त्यामुळे नोंदणी शुल्क, विलंब माफी दंड, न्यायालयीन शुल्क आदी रक्कम पक्षकारांना जमा करावी लागते. न्यास व संस्था नोंदणी प्रस्ताव तसेच नोंदणी प्रमाणपत्रे देण्यासाठी ऑनलाइन प्रणाली आधीच सुरू आहे. सह आयुक्त रजनी क्षीरसागर यांच्या पुढाकाराने डिजिटल पेमेंट लिंक विकसित झाल्याने पुणे कार्यालयाचा कारभार गतिमान व जनसामान्यस्नेही होण्यास मदत होणार आहे.n*डॉ. राजेश परदेशी*nधर्मादाय उपायुक्त तथा आस्थापना प्रमुख सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *