धर्मादाय संस्थांचे ऑडिट दाखल करण्यास मुदतवाढnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnसनदी लेखापालांकडून लेखापरीक्षण झालेले वार्षिक हिशोबपत्रके (ऑडिट रिपोर्ट) मुंबई येथील मुख्य धर्मादाय कार्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अपलोड करण्यास प्रचंड तांत्रिक अडचणी येत आहेत. संस्था चालकांची ही रास्त अडचण लक्षात घेवून महाराष्ट्र राज्याचे धर्मदाय आयुक्त अमोघ श्यामकांत कलोती यांनी वार्षिक हिशोबपत्रके दाखल करण्याची मुदत ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वाढविली आहे.nnया बाबतचे परिपत्रक क्र. ६१५ हे तीस डिसेंबर रोजी निर्गमित झाले असून त्यामुळे ही मुदत एक महिन्याने वाढली आहे. ट्रस्ट कायद्या नुसार आर्थिक वर्ष संपल्यावर सहा महिन्यात म्हणजेच तीस सप्टेंबर पर्यंत वार्षिक हिशोबपत्रके सादर करायची असतात. त्यावेळी आयकर कायद्या प्रमाणे रिटर्न भरण्याची अनिवार्य मुदत असल्याने धर्मादाय कार्यालयात दाखल करायच्या वार्षिक हिशोबपत्रकांची मुदत यापूर्वी डिसेंबर अखेर वाढवली होती.nnमुंबई येथील मुख्यालयातील मुख्य सर्वर बाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ऑडिट रिपोर्ट अपलोड करण्याचे काम विलंबाने होत होते. त्यामुळे अनेक संस्थांचे प्रतिनिधी हतबल झाले होते त्यांना आता दिलासा मिळाला आहे.n*अँड. शिवराज कदम जहागिरदार*nमाजी अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणे