कृषिदूतांनो भारीच! रांगोळीतून रेखाटला बोराटवाडीचा “नकाशा “nn
nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnदि.12 डिसेंबर 2024 : बारामती कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थीnओंकार झेंडे , शंकरानंद स्वामी, गिरीश शितोळे, संकेत झेंडे , प्रणित ननावरे , मनोज लडकत , मंगेश कामठे ,निर्भय शेंडगे हे बोराटवाडी तालुका इंदापूर येथे ग्रामीण कृषी कार्यानुभवnकार्यक्रमा अंतर्गत येथे ३ महिन्या साठी मुक्कामी आहेत .nकृषी कार्यानुभव अंतर्गत सुरू असलेल्या अनेक प्रयोगांनी व प्रात्यक्षिकांनी येथील नागरिकांना शेती निगडीत माहिती देण्याचे काम हे कृषीदूत करत आहेत.nया कृषिदूतांनी,संस्थेचे मुख्याधिकारी एस.पी.गायकवाड आणि व्ही.एस.बुरुंगुळे याच्या मार्गदर्शनाखाली गावातील ग्रामपंचायत कार्यालया समोर बोराटवाडी गावाची सुंदर अशी रांगोळी रेखाटली .nयात गावातले प्रमुख रस्ते, शेती,ग्रामपंचायत, मंदिरे , नदी , प्राथमिक विद्यालय, पाणपोई , व इतर महत्वाची ठिकाणे दाखवण्यात आली .nया वेळी गावचे सरपंच श्री.दत्तू यशवंत सवाशे व उपसरपंच श्री.अभिजीत विठ्ठल फडतरे, ग्रामसेवक श्री.भाऊसाहेब सवाशे व इतर ग्रामस्थ उपस्थीत होते.