Uncategorized

वडापुरी-काटी रस्त्याच्या कामात ठेकेदार करतोय चिकटपणा !

वडापुरी-काटी रस्त्याच्या कामात ठेकेदार करतोय चिकटपणा !nnscreenshot 20241027 121029 instagramnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क ) संतोष भोसले, रेडा :nnइंदापूर दि २७ ( प्रतिनिधी ) वडापुरी – काटी रस्त्यांच्या सहा – सात किलोमीटर अंतरासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद असताना आधिकच्या नफ्यासाठी ठेकेदार रस्त्याच्या कामात करतोय चिकटपणा करत आहे.nइंदापूर तालुक्यातील मौजे वडापुरी ते काटी या सात किलोमीटर अंतरावर सध्या नव्याने रस्ता मजबुतीकरणाचे काम धुमधडाक्यात सुरू आहे. सदरच्या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी १२ कोटी रूपयांची तरतूद केली आहे.nnरस्त्याचे काम हे जुलै व ऑगस्ट २०२४ मधे सुरू झाले. कामासंबंधी ठेकेदार याने रस्त्याचे काम सुरू करताना सार्वजनिक बांधकाम उपविभाग इंदापूर या कार्यालयातील मार्गदर्शक सूचनेनुसार व कार्यारंभ आदेश्यातील सूचनेनुसार सार्वजनिक हिताची माहितीचा फलक न लावता घाई गडबडीत काम चालू केले. काम सुरू असताना ठेकेदार याने कामगार व प्रवाशी वाहतूक वाहनासह दुचाकी, चारचाकी, सह अन्य कुठल्याही प्रवाशांची सुरक्षिततेची हामी घेतली नाही .nnरस्ता बांधकाम कामात कामाच्या ठिकणी अंदाजपत्रक ही उपलब्ध करून ठेवले नाही. तर अंदाजपत्रकातील नमूद घटक/ वस्तू या गुणवत्तापूर्ण न वापरता दर्जाहीन साहित्याचा वापर म्हणजेच रस्त्याची बाजूपट्यावर कठीण मुरूमाचा वापर न करता रस्त्यालगत गटरीतील माती टाकून रस्ता मजबुतीकरणाचे काम सध्या वेगात चालू ठेवले आहे . तसेच रस्ताच्या डांबरीकरण म्हणजेच बी, बी, एम. चे काम करताना पुर्वीचा रस्ता खोदकाम करून एकजीव करणे गरजेचे असताना अत्यंत अल्पशा प्रमाणात डांबर फवारणी करून खडी व कच ही अल्पशाप्रमाणात टाकून सौम्य रोलिंग करीत आहे.nnसदरचा रस्ता हा सन २०२१-२२ या कालावधीत झालेला असताना याच रस्ताचे काम निकृष्ट म्हणून काटी गावातील युवकांनी अमरण उपोषण व आत्मदहना ईशारा दिल्यानंतर पुणे येथील सार्वजनिक बांधकाम (पुर्व) विभाग यांनी याच रस्ताचे देखभाल दुरूस्ती ही किमान ३ वर्षे ठेकेदार यांच्याकडे असते सांगून तक्रारी निकाली काढण्यात आली होती . मग पुन्हा याच रस्त्यावर, याच ठेकेदार मार्फत १२ कोटी रूपयांची तरतूद कशी? अशी शंका ? वडापुरी – काटी परिसरातील नागरिक संभ्रमात आहेत . पण कुनाचे काही असो प्राप्त निधीतून अधिकचा नफा मिळवण्याच्या ललची पणा मुळे चालू रस्ताच्या कामात तरी अंदाजपत्रकातील नमूद घटक/ साहित्याचा वापर ठेकेदाराने चिकटपणा न करता पुरेशा प्रमाणात करावा अशी या रस्त्यावरील ये – जा करणा-या प्रवाशीसह नागरिकांतून बोलले जात आहे.nnयासंदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग इंदापूर या कार्यालयातील जून २०२२ मधे बदली झालेले व पुन्हा पुणे येथील सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियांता अतुल चव्हाण यांच्या आर्थिक संबंधातून जानेवारी २०२४ मधे अतिरिक्त पदभार स्वीकारलेले शाखा अभियांता अधिकारी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क झाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *