Uncategorized

निमसाखर येथे सर्पमित्र अमित अडसूळ यांचे घरी सापडला ‘रसल कुकरी’ जातीचा दुर्मीळ साप 

निमसाखर येथे सर्पमित्र अमित अडसूळ यांचे घरी सापडला ‘रसल कुकरी’ जातीचा दुर्मीळ सापnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे सर्पमित्राच्या घरी ‘रसल कुकरी’ हा दुर्मीळ साप आढळला. सर्पमित्र अडसूळ सर यांनी सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. अशा प्रकारचा साप प्रथमच आढळल्याने निमसाखर परिसरात तो कुतुहलाचा विषय झाला.nnनिमसाखर येथील वन्यजीव संरक्षण संस्था चे उपाध्यक्षअमित अडसूळ सर यांच्याकडे दुर्मीळ साप आढळला. अडसूळ सर कामानिमित्त बाहेर गेले असता सकाळी घरी त्यांच्या मुलीला घरामध्ये साप येताना दिसला तिने लगेच वडिलांना फोन करून घरामध्ये साप आला आहे सांगितले.nकसा आहे ‘रसल कुकरी’ -nnरसेल कुकरी साप दुर्मीळ असून निमसाखर परिसरामध्ये प्रथमच आढळला आहे. हा साप बिनविषारी गटातील असून याची सरासरी लांबी १.६ इंच आहे. या सापाच्या मानेवर उलटा ‘व्ही’ अक्षराची खुण असते. या सापाचे पोट पांढरट किंवा फिकट पिवळसर असते. त्याचे शरीर सडपातळ व शेपुट आखुड असते. साधारण एप्रिल महिन्यादरम्यान या सापांचा प्रजनन काळ असतो. एक मादी ५ ते ९ अंडी घालते. लहान-लहान सरपटणारे प्राणी, किटक व त्यांची अंडी या सापाचे खाद्य असते. हा साप अंत्यंत शांत स्वभावाचा समजला जातो. मात्र, जर कधी हल्ला करायचा असेल तर, तो शरीर फुगवून हल्ला करतो, तसेच माझ्या वीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये निमसाखर परिसरामध्ये प्रथमच हा साप पकडला अशी माहिती सर्पमित्र अडसूळ सर यांनी दिली.nnआपल्या परिसरात जखमी जंगली प्राणी साप तसेच जखमी पक्षी आढळल्यास वन्यजीव संरक्षक संस्था इंदापूर यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन श्री. अडसूळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *