Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

परीपूर्ण बदल अर्जांची तातडीने सुनावणी होणार – ॲड. शिवराज कदम- जहागिरदार 

परीपूर्ण बदल अर्जांची तातडीने सुनावणी होणार – ॲड. शिवराज कदम- जहागिरदारnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnधर्मादाय ट्रस्ट व संस्थांच्या बदल अर्जांची तातडीने सुनावणी होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोघ शामकांत कलोती यांनी परीपत्रक क्र. ६११ नुकतेच जारी केले आहे. बदल अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.nnबदल अर्ज मुख्यत्वे तीन कारणांसाठी दाखल करण्यात येतात. सर्वसामान्य पणे विश्वस्तांच्या वंशपरपरेनेने, राजीनाम्याने अथवा कार्यकाळ संपलेल्या विश्वस्तांच्या जागी नवनियुक्त विश्वस्तांची निवड सुचित करणारे बदल अर्ज हे सर्वात जास्त संख्येने असतात. अशाप्रकारचे बदल अर्ज दाखल करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत त्याची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार ट्रस्ट डीड अथवा नियम नियमावली, नोंदणी दाखला, विश्वस्त सभेची नोटीस व त्याची पोच, कार्यवृत्तांत, निधन झालेल्या विश्वस्ताचा मृत्यु दाखला अथवा कार्यकाळ संपलेल्या विश्वस्तांचे नाव कमी करण्यास हरकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र तसेच नियुक्त झालेल्या विश्वस्तांचे संमतीपत्र आवश्यक आहे. असे संमतीपत्र देताना त्या विश्वस्ताचे पूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, शासनमान्य ओळखपत्राची प्रत, दूरध्वनी अथाव भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल आय डी देणे बंघनकारक करण्यात आले आहे.nnदुसरा प्रकार हा स्थावर मिळकती नोंदविण्यासाठी नमुना ३अ नुसार करण्यात येणाऱ्या बदल अर्जांचा आहे. या अर्जासोबत खरेदीखत, बक्षिसपत्र अथवा मृत्युपत्राने अशी मिळकत ट्रस्टला प्राप्त झाली असल्यास त्याची नोंदणीकृत प्रत देणे आवश्यक आहे. मिळकतीची विक्री झाली असल्यास सह धर्मादाय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीची प्रत व विक्री करारनाम्याची नोंदणीकृत प्रत बदल अर्जासोबत जोडावी लागणार आहे.nnतिसऱ्या प्रकारच्या बदल अर्जांद्वारे संस्थेच्या नियम नियमावलीमध्ये करण्यात आलेल्या दुरूस्ती बाबत असतात. या मध्ये संस्था नोंदणी अधिनियमाचे कलम १२ व १२अ नुसार झालेले बदल नोंदवण्याचा अर्ज व त्यासोबत कार्यकारिणी सभेचे तसेच सभासदांच्या दोन विशेष सभांचा कार्यवृत्तांत सादर करणे आवश्यक आहे. त्यासमवेत नविन नियमावलीची अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांनी स्वाक्षांकित केलेली प्रत व जुन्या व नविन तरतूदींचा तुलनात्मक तक्ता जोडणे अनिवार्य केले आहे.nnतसेच एक ॲागस्ट २०२४ पासून मुंबई येथील मुख्यालयामध्ये ॲानलाईन पेमेंट करण्यासाठी एसबीआय कलेक्ट द्वारे सुविधा सुरू करण्यात आली आहे. https://www.onlinesbi.sbi/sbicollect या वेबसाईटच्या होमपेजवर Government Departments अंतर्गत CHARITY COMMISSIONER या शिषर्काखाली येणाऱ्या पर्यायातून पैसे ॲानलाईन भरता येतील. तसेच मंबई कार्यालयात क्यु आर कोड दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे आवश्यक शुल्क अदा केल्ऱ्यावर निर्माण होणाऱ्या पावतीची प्रिंटआउट सोबत जोडावी लागेल.nnया परीपत्रकानुसार न्याय शाखेच्या अधिक्षकांकडे बदल अर्ज दाखल होताच त्याची पडताळणी करून त्याच दिवशी तो उपायुक्त अथवा सहाय्यक आयुक्तांकडे पुढील आदेशासाठी सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे कागदपत्र पुर्ततेसाठी कार्यवाही न होता बदल अर्ज प्रलंबित राहणार नसल्याचे पुणे पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे माजी. अध्यक्ष ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *