Uncategorized

कृषीकन्यांनी केले वांग्याच्या रोपावर टोमॅटोचे कलम

कृषीकन्यांनी केले वांग्याच्या रोपावर टोमॅटोचे कलमnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnखुंटे ( ता.फलटण ) गावामध्ये डॉ .शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामतीच्या कृषीकन्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी आल्या आहेत.त्या शेतीशी निगडीत नवनवीन उपक्रम राबवत आहेत .असाच एक उपक्रम त्यांनी भाजीपाला कलामांवर केला.कृषीकन्यांनी वांग्याच्या रोपावर टोमॅटोच्या रोपाचे कलम करण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवले. भाजीपाला कलम तंत्रज्ञानामुळे अजैविक ताणापासून सहनशीलता येते , वाढ जोमाने होते व भाजीपाल्याची गुणवत्ता सुधारते.nnकृषीकन्या साक्षी दळवे, सुस्मिता कारंडे ,सायली काटे, प्रगती पाटील , वैष्णवी पाटील आणि पूजा फडतरे यांनी वांग्यावरील टोमॅटोचे तिरकस पद्धतीचे कलम करण्यासाठी शेतकऱ्याना मार्गदर्शन केले . गावातील शेतकऱ्यांनी देखील हे कलम स्वतः करून पाहिले.या प्रसंगी गावातील प्रगतशील शेतकरी रोहित खलाटे, मच्छिंद्र खलाटे, राजेश गांधी, गणेश खलाटे,राहुल काकडे यांच्यासह महिला शेतकरी रेश्मा खलाटे आणि मंगल भोईटे देखील उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *