खुंटे गावामध्ये कृषिकन्यांनी राबवली लम्पी विरोधी लसीकरण मोहीमnn
nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnखुंटे गावामध्ये ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमासाठी शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाच्या कृषिकन्या कु. साक्षी दळवे, कु .सुस्मिता कारंडे , कु . सायली काटे ,कु.प्रगती पाटील ,कु .वैष्णवी पाटील ,कु.पूजा फडतरे यांचे आगमन झाले आहे.या कृषिकन्या गावामधे शेती क्षेत्राशी निगडित नवनवीन उपक्रम राबवत आहेत.nnगावात लम्पी रोगाने बाधित झालेल्या गाईंचे प्रमाण आणि तीव्रता बघता कृषिकन्यांनी गावामध्ये मोफत लसीकरण मोहीम राबवली व यशस्वीरित्या पार पाडली.या साठी त्यांना डॉ.सचिन बुरुंगले यांनी खूप मोलाची साथ दिली.nnया मोहीमे अंतर्गत श्री.रामराजे खलाटे , श्री. दिलीप खलाटे, श्री .संदीप तोरस्कर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यांवर लसीकरण करण्यात आले.या मोहीमेसाठी कृषिकन्यांना प्रा.शेंडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.