Uncategorized

अज्ञाताने वालचंदनगर येथे दुचाकी जाळली

nnअज्ञाताने वालचंदनगर येथे दुचाकी जाळलीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnवालचंदनगर ( ता. इंदापूर ) येथील मेन कॉलनीतील जी-2 येथे रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास दुचाकी गाडीला आग लावून जाळण्यात आली. वालचंदनगर येथील पत्रकार प्रतापसिंग उर्फ अमोल रजपूत यांची घरासमोर लावलेली दुचाकी क्रमांक एम. एच. 42 ए. यु. 0377 या टी.व्ही.एस. कंपनीच्या ज्युपिटर गाडीला आग लावून पेटवून देण्यात आली.nnमध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास रजपूत यांच्या पत्नी लहान मुलीला पाणी पाजण्यासाठी उठल्या असता घरासमोर आग लागल्याचे निदर्शनास आले ही बाब त्यांनी अमोल रजपूत यांना सांगितल्यानंतर बाहेर येऊन पाहिले असता अज्ञात इसमाने त्यांच्या दुचाकीला आग लावल्याचे दिसले. सदरील आग पाणी टाकून विझवण्यात आली मात्र तोपर्यंत गाडी जळून मोठे नुकसान झाले होते.nnयासंदर्भात वालचंदनगर पोलीस स्टेशन मध्ये कलम 435 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेश पवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *