Uncategorized

बारामती लोकसभा मतदार संघातून “अजित पवार “यांचा उमेदवारी अर्ज!

बारामती लोकसभा मतदार संघातून “अजित पवार “यांचा उमेदवारीअर्ज!nnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि भाजपच्या मोदी -शहा -फडणवीस यांच्या प्रतिष्ठेच्या हा बारामती लोकसभा मतदार संघ आहे.nnबारामती लोकसभा मतदारसंघात कोणताही दगाफटका होऊ नये म्हणूनnअजित पवार आणि भाजपकडून खबरदारी घेण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.nnत्यामुळे भाजप व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज काही कारणांनी छाननीमध्ये रद्द झाल्यास उमेदवारीबाबत प्रश्न उभा राहू नये म्हणून पर्यायी उमेदवार म्हणून अजित पवार यांचाही उमेदवारी अर्ज भरला जाण्याची शक्यता आहे.nnत्यामुळे अजित पवार हे बारामतीचे ‘डमी’ उमेदवार असणार आहेत, हे नक्की.nnबारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.nnसुनेत्रा पवार या १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत.nnत्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेण्याबरोबरच अजित पवार यांच्याही नावाने अर्ज घेण्यात आले असल्याचे या मतदार संघांसाठी विधानभवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयात तून सांगण्यात आले. या ठिकाणी या बारामती लोकसभा मतदार संघांसाठी निवडणूक कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.nnउमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीच्या उमेदवारांकडून खबरदारी घेतली जात आहे. या छाननीमध्ये अर्ज बाद होऊ नये, यासाठी उमेदवारांकडून अर्जाची बारकाईने तपासणीही केली जात आहे.nnतरीही उमेदवारी अर्ज काही कारणांमुळे रद्द झाल्यास महायुतीने आपला पर्यायी उमेदवार म्हणून त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचा अर्ज दाखल करणार आहे.nnमतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात 12 एप्रिल पासून झाली असून अंतिम मुदत १९ एप्रिल आहे. त्यामुळे १८ एप्रिल रोजी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जाणार आहेत.nnमहायुती ने पर्यायी उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या नावाने अर्ज घेण्यात आला आहे. त्यांनी अर्ज दाखल केल्यास ते बारामतीतील पर्यायी उमेदवार असणार आहेत, हे नक्की.nnबारामती मतदारसंघाची निवडणूक ही अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा दगफटका होऊ नये, यासाठी अजित पवार यांच्याकडून खबरदारी घेण्यात येत आहे.nnबारामती लोकसभा मतदार संघांसाठी सोमवारी 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तसेच 15 उमेदवारांनी अर्ज नेले आहेत.nnसुप्रिया सुळे 18 एप्रिल ला भरणार अर्ज -nnमहाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरद चंद्र पवार या पक्षा कडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *