Uncategorized

छत्रपती शिवाजी राजे यांचे विचार आत्मसात करा – शिवव्याख्याते सुशेन नाईकवडे

छत्रपती शिवाजी राजे यांचे विचार आत्मसात करा – शिवव्याख्याते सुशेन नाईकवडेnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnआज च्या तरुण युवकांनी छत्रपती शिवाजी राजे यांचे विचार आत्मसात करने काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवाव्याख्याते सुशेन नाईकवडे यांनी केले, ते रेडणी (ता इंदापूर )येथे रेडणी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या “शिव जयंती “कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील होते.nnआजची तरुणाई भरकट त चालली आहे, समाजात अशांतात निर्माण झाली आहे, युवकांचे वाचन खूपच कमी आहे, युवकांनी राजा शिवछत्रपती, शंभूराजे, यांचे विचाराने चालले पाहिजे.nnमोघलांनी मोगल शाही, आदिल शहाणे आदिलशाही, निजामाने निजामशाही, कुतू बशहाणे कुतूबशाही स्थापन केली, परंतू छत्रपती शिवाजी राजांनी “स्वराज्य “स्थापन केले. याचा विचार आचरणात आणला पाहिजे.nnया कार्यक्रमांस इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे, सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक सचिन शिंदे, विराज निंबाळकर, नीरा भीमा साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत भोसले, तानाजी नाईक, कृषि उत्पन्न बाजार समिती चे माजी संचालक सचिन देवकर,सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक अमरदीप काळकुटे, नरेंद्र भोसले, रेडणी ग्रामपंचायत चे सरपंच श्रीमती हिराताई खाडे, उपसरपंच सुभाष शिर्के, ग्रामपंचायत सदस्य संतोष काळकुटे, लक्ष्मण काळकुटे, स्वाधीन खाडे, राजेंद्र सोनटक्के, विश्वास लोंढे माजी सदस्य मच्छिन्द्र तरंगे, गजानन सोनवले,माजी सरपंच दिनकर खाडे,नवनाथ खाडे,पठण घोगरेकिसन डोंगरे,ग्रामपंचायत चे लिपिक हरिभाऊ काळे, अशोक मोहिते, रामभाऊ मोहिते,इ. मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमांस बहुसंख्येने ग्रामस्थ व परिसरातील शिव प्रेमी उपस्थित होते.nnया कार्यक्रमात राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नरेंद्र भोसले व शंकर काळकुटे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार केला.nnया कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन तरंगे यांनी केले, तर आभार युवा नेते हरिभाऊ काळकुटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *