Uncategorized

अपप्रवृत्तींवर घाव आणि खऱ्याचा भाव मिरवणारा काव्यसंग्रह : सर्जन विसर्जन

अपप्रवृत्तींवर घाव आणि खऱ्याचा भाव मिरवणारा काव्यसंग्रह : सर्जन विसर्जनnn-प्रा. लेखक -रवींद्र गुरवnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnसर्जन विसर्जन हा तरुण कवी विक्रम वागरे यांचा दमदार काव्यसंग्रह दर्या प्रकाशनकडून प्रकाशित झाला आहे. कवी मन आणि अख्खा भोवताल कवेत घेणारा हा संग्रह मुक्तछंदाइतकाच छंदबद्ध कविता घेऊन गझलच्या अंगानं हुदकतच आला आहे. साजेसं बोलकं मुखपृष्ठ घेऊन ज्येष्ठ कवी अजय कांडर यांची मलपृष्ठावर ब्लर्ब पाठराखण लेवून मिरवत आला आहे‌. कवीच्या व्यासपीठीय कवितांनी जितकी रसिकांना भूरळ घातली तितक्याच या संग्रहातील कविताही रसिक मनाला भिडणाऱ्या आहेत‌‌.nnनव्या पिढीतला हा दमदार कवी नवा साच्यातली काव्यरचना रूढ करणारा आहे. ही संपदा ताकतीने घेऊन आला आहे. राधानगरी परिसरातील बोलीभाषेतील शब्द कवेत घेऊन ४० कवितांचा हा संग्रह आला आहे. अपप्रवृत्तींचं विसर्जन करत नव्या सर्जनाला प्रेरणादायी भाव देणारा हा संग्रह चौफेर असा असून वास्तवाचा आवाका अचूक मांडणार आहे. आजचं दाहक वास्तव या कवीच्या कवी मनानं टिपलेला आहे तेही धारदार अशा शब्दांनी घाव घालत. कशाचीही तमा, फिकीर न बाळगता. सत्य बोलण्याचं धाडसी काम यासंग्रहाच्या कवीच्या कवितांनी केलं आहे.nझाडं, माणसातली हरवत चाललेली संवेदनशीलता, कवी मन, पाणी, मुलं डांबून ठेवणारी शाळा, स्वार्थ, जाती-धर्मातली दंगल, वाटून घेतलेले रंग, महापूर, स्त्रीभ्रूणहत्या, कावळे, राष्ट्रीय एकात्मता, पाऊस, ढग, माती, समता, प्रेमाचे पाश तोडून दूर जाणारी मुलं असे एकापेक्षा एक सरस काव्य बीज घेऊन आलेली ही काव्यसंपदा कविता हाच उपाय सांगते आणि उजेडाची कविता तर स्वतःसह इतरांना लख्ख वाट दावणारी अशीच वाटते. वरकरणी हा इवलासा संग्रह वाटला तरी दांडगा आवाका मांडणारा हा काव्यसंग्रह आहे. असा हा सर्व समावेशक दमदार काव्यसंग्रह कवीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना अर्पण केला आहे.nnशाश्वत…या कवितेतnझाडे- गीता कुराण बायबलच्याही आधीपासून होती असं सांगत झाडांचं ज्येष्ठत्व आभाळाला टेकवतो. धर्म, ग्रंथ हे सारं त्या पुढं फिकं पडतं.nnमाणसातली संवेदनशीलता हरवत चालली हे सांगतानाnकनेक्शन ऑफnया कवितेत कवी म्हणतो, डोळ्यांकडून हृदयाकडे जाणारी नसnमध्येचnतुटली असावीnबहुतेक…..nखरंच हे विचार करण्यासारखंच भयाण वास्तव आहे.nnती वीज पकडते तेव्हा…nया कवितेत तिला कळलं खरंच कवीशी लग्न करणं म्हणजे वीज पकडणं असतं हे अगदी प्रामाणिकपणे वेगळ्या धाटणीतनं मांडतोच. ते अनेकांचे डोळे उघडत.nnकृतज्ञ…कवितेत शाळेत मुलांची होणारी कुचंबणा मांडली आहे. व्यवस्थेनं निव्वळ नियम, शिस्त चघळत त्यांना डांबून ठेवण्यात अर्थ नाही हेच सत्य वदते ती अशी..nआमची पोरं आजकालnगांधीजींना शरण जाऊनnकरत असतात उपोषणnदुपारच्या सुट्टीपर्यंत…nnशहाणपणाची गोष्ट ही तर खूप काही सांगून जाते. वटसावित्रीची कविता ही खरी वटसावित्री डोळ्यापुढे आणून उभी करते.nnढग…हे तर अगदी अजब गजब आहेत. म्हणून तर हे इथले काव्य-nढग चुकूनही घेत नाहीत चढवून स्वतःवरnलाल, भगवे, हिरवे किंवा निळेपणn……nसर्जनासाठीnविसर्जनासाठीnआभाळातून अध:पतित होऊन… असं ठासून सांगते.nnदंगलीच्या दुसऱ्या दिवशी….nया कवितेतnसगळं स्तब्ध असताना कवी म्हणतो,nगटारातलं पाणी तेवढंnकुणाला न जुमानता वाहात होतं.nहे नुसतं नेमकं आणि मार्मिक भाष्यच नाही तर सद्यस्थितीला डागणी ओढणारं, चटके देणारं असंच आहे.nnवारांगनेच्या डायरीचे शेवटचे पान….या पानात तिची आई तिला म्हणते,nमाफ कर लेकी मलाnस्त्रीचे शरीरnआणि माझीच मळलेली पायवाट याशिवाय काहीच देता आलं नाही तुलाn….nलक्षात ठेव पोरी,nआपण नसतोच कधीnकुणाच्या आत्या, मावशी, ताई किंवा माईnआपल्यासाठी असतं एकच नाव -बाईnजाता जाता एवढंच सांगते पोरीnहे सारं ऐकण्याची वेळnकधीचnतुझ्या पोरीवर येऊ देऊ नकोस.nआपल्या वाटेला आलेली वेदना आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नये हे सांगणारी वारांगना आपली भयान वेदना लपवत लेकीला या बरबटलेल्या स्वार्थी जगात आपल्या पायावरnसक्षम व्हायला, उभं राहायला, निर्भर करायला प्रेरणा देते.nnआठवून बघ…ही कविताnएकदा आपल्याला पाऊस भेटला होता… सारखी ओळ ओठांवर येते ती आपसूकच छंद बद्धता लेवूनच. पावसाच्या ही डोळ्यात असलं रूपडं घेऊनच..nऐकताना त्याच्याही डोळ्यांतnनवा पाऊस दाटला होता असं म्हणत आणि तिचं जाणं तेही काळजाला टोचत.nnआम्ही भारतीय लोक…ही कविता तर आम्हीnरंग कसे जाती-धर्मानं वाटून घेतलेत ते कडवं सत्य सांगते. पुढं आपली राष्ट्रीय एकात्मता आत्महत्या करेल अशीही विदारक परिस्थिती सांगते.nnपितृपक्षाची कविता….nकावळे सदैव उपेक्षितच ही खंत मांडते. ते कावळेच असावेत आमचे पितर बहुधा… म्हणत.nn’मदरलँड’ची वांझोटी कविता….nस्त्रीभ्रूण हत्येवर प्रहार करते.nवांझोट्या पुरुषत्वाला शड्डू ठोकून आव्हान करते.nnशेतकऱ्याची दयनीय अवस्था उपरोधानंnशेतकरी कधीच करत नाही आत्महत्या…..nमध्ये येते.nnअत्तर, शोधतो आहे, समतेचे सुक्त, पळस, आज सकाळी पुन्हा, येशी कधी, आशेचा प्रकाश नाही या कविता गझल अंगाने खूप काही पेरून जातात.nआशेचा प्रकाश नाही हे सांगताना कवी म्हणतो,nलांडग्यांचे राज्य आले लांडगेच माजलेnकुठेच सिंहगर्जनेचा कोणताच भास नाही.nnकलियुग..nकलियुगात सगळं उलटच घडतंय आराजगता माजली आहे हे ठासून सांगते. खऱ्याचं खोटं नि लबाडाचं गाल मोठं कसं झालेत हे सांगते. वासनांधता, दुकानदारी हे दाखवते ते.‌n..गवळणीच्या मालालाnकवडीचे मोलnमथुरेच्या हायवेवरnपेंद्याचा टोल.‌..nहे असं म्हणत.nnउजेडाची कविता….nकविता तर स्वतःला लख्ख वाट दावणारी अशीच आहे.nnआदिम दुःखांसाठी कुठली दवा ना दारूnओले काळीज आणि कविता हाच उपाय…nअशी विक्रमची कविताच मनातून ठासून सांगते. एकंदरीत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्वांगाना स्पर्श करत पटेल ते उजेडात आणत नको ते गाडत पुढे झालेला हा काव्यसंग्रह वाचनीय आणि चिंतनीय असाच आहे. यात उणं काढायला तशी फट, जागा न ठेवलेल्या नाहीतच म्हणूनच अशा या दमदार काव्यसंग्रहाबद्दल कवीचं अभिनंदन आणि पुढच्या साहित्य प्रवासाला अनंत शुभेच्छा….nn_____________________nn*सर्जन विसर्जन*n*(काव्यसंग्रह)*n*कवी- विक्रम वागरे.*n*प्रकाशन- दर्या प्रकाशन, पुणे.*n*पृष्ठे- ७४*n*मूल्य- १२०₹*n_____________________nरवींद्र शिवाजी गुरवnचिपळूण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *